"संत गजानन शेगावीचे" मालिकेत गायक संगीतकार विनोद शेंडगे साकारत आहेत भूमिका.

Updated: Sep 2

कॅमेरामन संतोष पेडणेकर समवेत.

"संत गजानन शेगावीचे" या मालिकेमधे पंढरपूर येथील संगीतकार व गायक श्री. विनोद शेंडगे हे गायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गायक अभिनेता म्हणून

पुढील काही भागात गायनाचार्य पंडित घनश्याम शास्त्रीजी यांची भूमिका ते साकारत आहेत.

गायक, ध्वनिमुद्रक आणि संगीतकार म्हणून काम करत असतानाच आता गायक अभिनेता म्हणून श्री. विनोद शेंडगे प्रेक्षकांसमोर येत आहेत.


"सन मराठी" या टिव्ही चॅनलवरील सध्या सुरू असलेल्या "संत गजानन शेगावीचे" या सिरियलचे टायटल साँग सुद्धा श्री. विनोद शेंडगे यांनी संगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल देशपांडे यांनी ते गायले आहे. आतापर्यंत या मिलिकेतील 7 ते 8 प्रसंगानुरूप गाणी श्री. शेंडगे यांनी आपल्या अनाहत रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये संगीतबद्ध केली असून स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन ही गीते गायली आहेत. त्यामुळे पंढरपूर येथील कलाकारांना टिव्ही मालिकेत पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली आहे.


श्री. विनोद शेंडगे यांची या मालिकेतील शास्त्रीय संगीतावर अधारित अनेक गीते सध्या लोकप्रिय झालेली आहेत. सुप्रसिद्ध गायिका कु. अंजली गायकवाड हिने गायलेली "आज मैं रंगली पियाजी के संग" ही ठुमरी व "चंदन चावल बेल की पतिया" हे स्वतः विनोद शेंडगे यांनी गायलेले गीत अनेक प्रसंगातून मालिकेत दाखविण्यात आल्याने ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

दिग्दर्शक नितीन काटकर व कथा लेखक प्रसाद ठोसर यांचे समवेत विनोद शेंडगे.

या मालिकेची निर्मिती मुंबई येथील ट्रम्प कार्ड प्राॅडक्शनची असून श्री. तेजेंद्र नेसवाणकर हे निर्माते आहेत. कथा श्री. प्रसाद श्रीकांत ठोसर यांची तर खास वऱ्हाडी भाषेतील संवाद लेखन श्री. संजीव कोलते यांचे आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. संतोष पेडणेकर हे कॅमेरा सांभाळत आहेत तर श्री. नितीन काटकर यांचे दिग्दर्शन या मालिकेला लाभले आहे.

संत गजानन महाराजांची भूमिका श्री. अमित फाटक साकारत असून त्यांचेबरोबर सुधाकर दोडके, पूजा नायक, मयुर खांडगे, अक्षय टाक, सरिता मेहेंदळे-जोशी, जितेंद्र पोळ, विजय पवार, प्रतिमा देशपांडे असे दिग्गज कलाकार या मालिकेमधे काम करत आहेत.

"सन मराठी" चॅनलवर दररोज रात्री 9 वाजता "संत गजानन शेगावीचे" ही सिरियल प्रसारित होत आहे.

197 views0 comments