गायक विनोद शेंडगे पुस्तकांना जगभरातून प्रतिसाद.

Updated: Sep 2


पंढरपूर येथील गायक व संगीतकार श्री. विनोद शेंडगे यांची शास्त्रीय संगीत विषयक 10 पुस्तके amazon वर प्रकाशित झाली आहेत. आणि अजुनही काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या पुस्तकांना संपूर्ण जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. kindle एडिशन मध्ये amazon वर. तर pdf रुपामध्ये त्यांच्या स्वतःच्या वेबसाईट वर ही पुस्तके उपलब्ध आहेत. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि पुस्तके महत्वाची ठरत आहेत.
शास्त्रीय संगीतामध्ये राग समजावून घेताना रागाची माहिती आणि तान तयार करण्याच्या पध्दती या विषयीची हि पुस्तके आहेत. आजपर्यंत एका रागासाठी एक पुस्तक. अशा 10 रागांची तान तयार करण्याची पध्दती या विविध पुस्तकांमधून दिली आहे.

amazon वर विनोद शेंडगे यांचे लेखकाचे एक स्वतंत्र पेज असून त्यामध्ये त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे. प्रत्येक रागामध्ये तान तयार करून दाखविल्या आहेत. सुरुवातीला त्या रागाची शास्त्रीय माहिती, राग विशेषता, इतर रागांशी सबंध आणि तुलनात्मक अभ्यास यावर लिखाण केले असून नंतर सपाट तान, पलटा तान, अलंकार तान, संमिश्र तान असे विविध तानांचे प्रकार प्रत्येक पुस्तकामध्ये दिले आहेत.

नेहमीच्या पध्दतीपेक्षा अत्यंत सोप्या पद्धतीने आणि रागाचे शास्त्र नियम कायम ठेवून या तान बनवून दाखविल्यामुळे गायक, वादक यांना हि पुस्तके अतिशय मोलाचे मार्गदर्शक ठरत आहेत.
amazon वरील पुस्तके ही फक्त kindle एडिशन मध्ये उपलब्ध असून वेबसाईट वरील पुस्तके हि pdf रुपात उपलब्ध आहेत. आतापर्यंत भारता सह अमेरिका, ओस्ट्रेलिया, कॅनडा, अशा विविध देशातून हि पुस्तके वाचली जात आहेत.


भारतीय शास्त्रीय संगीत हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि सर्वांना ते मानसिक समाधान देत आहे. त्यामध्ये संगीत शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी advance knoledge म्हणून ही पुस्तके महत्वाची आहेत.

राग भूप, यमन, बिहाग, पुरिया, पटदीप, पुरिया धनाश्री, वृन्दावनी सारंग, दुर्गा, तोडी, भीमपलास या रागांची हि पुस्तके आहेत.ही पुस्तके पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावी. किंवा पुढील QR code स्कॅन करावा.

amazon लिंक :

Amazon.com: VINOD SHENDGE: Books, Biography, Blog, Audiobooks, Kindle

amazon QR CODEpdf मधील पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावी. किंवा पुढील QR code स्कॅन करावा.

pdf Link : Online Shop | SANTMUDRA

pdf QR code :