मनोगत

Dada_edited.jpg

वै. ह. भ. प. सुधाकर शंकर शेंडगे हे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व सिद्धहस्त लेखक होते. सा. पंढरी संदेश या सप्ताहिकामधून आपले आध्यात्मिक लिखाण त्यांनी सतत सुरु ठेवले. त्यांचे अनेक लेख हे महाराष्ट्रभर गाजले. त्यांच्या काही लेखांचा संग्रह या वेबसाईट वरुन प्रकाशित करत आहोत. संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासूंना या लेखांचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे. चैत्र वद्य एकादशी दि. १२ एप्रिल २०१८ रोजी त्यांचे वैकुंठगमन झाले. या वर्षी चैत्र वद्य एकादशी दि. ३० एप्रिल २०१९ रोजी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही वेबसाईट प्रकाशित करत आहोत. आयुष्यभर त्यांनी प्रिंटिंग क्षेत्रात काम केले. त्यांच्या प्रिंटिंग प्रेसचे नाव सुद्धा वेगळे होते. 'संतमुद्रा' नवाने त्यांनी १९८२ ते १९९८ या कालावधीत प्रेस संभाळला, १९९८ नंतर मुद्रण व्यवसाय मुलांच्या हाती सोपवून उर्वरित आयुष्य अखंड संत साहित्यासाठी खर्च केले. अखेरच्या श्वासपर्यंत त्यांचे हे कार्य सुरु होते. म्हणून या ब्लॉग साठी "संतमुद्रा" ही त्यांची स्वतःची ओळख असलेले नाव दिलेले आहे.  www.santmudra.com   या नवाने सुरु झालेल्या या वेबसाईटला आपण प्रतिसाद द्यावा. व हे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी शेअर करावे ही विनंती. या वेबसाईटवर सविस्तार लेख नित्य अपलोड केले जातील.

या वेबसाईटवर वै. दादांचे लेख तर प्रकाशित होतीलच. त्याशिवाय इतर मान्यवर लेखकांचेही लेख याठिकाणी प्रकाशित करण्याचा मानस आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक लेख हाच विषय राहील. तेंव्हा आपणही या साठी लेख पाठवून ही वेबसाईट उच्च अभ्यासपूर्ण होण्यासाठी मदत करावी ही विनंती.

अर्थातच वै. दादांचे लेख नेहमीच 'साप्ताहिक पंढरी संदेश' मधून प्रकाशित झाले आहेत. सा. पंढरी संदेशचे श्री. गजाननकाका बिडकर व बिडकर कुटुंब आणि पंढरी संदेश परिवारातील सर्व महाराज,  संपादक, मार्गदर्शक, सदस्य, वाचक यांचे ऋण व्यक्त करणे हे आम्हा कुटुंबियांचे कर्तव्य आहे.


या वेबसाईट साठी वेब डिझाईनिंग आणि वेब होस्टिंग साठी पुणे येथील आमचे स्नेही व दादांवर नितांत श्रद्धा असणारे श्री. सुरेंद्र मुळे व त्यांची पत्नी सौ. पूजा गोंदकर मुळे यांनी अथक परिश्रम घेऊन ही वेबसाईट तयार केली आहे. त्यांचेही मनापासून आभार. 


वै. दादांचा मित्र परिवार आणि शिष्य परिवार खूप मोठा आहे. त्या सर्वांचे सहकार्य या आधुनिक युगातील साहित्य प्रकाशनाला लाभेल अशी आशा व्यक्त करतो. वै. दादांची ही वेबसाईट सर्वदूर पोहोचण्यासाठी  ही लिंक सर्वांना शेअर करावी.


तसेच प्रत्येक लेखाच्या शेवटी त्या लेखाची लिंक दिली आहे. ती काॅपी करून आपण व्हाटस अँप व फेसबुकवर इतरांना शेअर करु शकता.


- समस्त शेंडगे परिवार.

संपर्क

​आपल्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत. प्रतिसाद द्यावा.